#ICC : चार दिवसीय कसोटीच्या प्रस्तावाविषयी चर्चा मार्चमध्ये

दुबई : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा विचार सुरू आहे. या प्रस्तावास जगभरातील आजी माजी क्रिकेटपटूंनी विरोध दर्शविला आहे.

चारदिवसीय कसोटीला जगभरातील आजी माजी क्रिकेटपंटूकडून होणा-या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) क्रिकेट समिती या प्रस्तावाविषयी मार्चमध्ये होणा-या बैठकीत चर्चा करणार आहे. आयसीसी क्रिकेट समितीचे अध्यक्ष अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली २७ ते ३१ मार्च दरम्यान दुबई येथे ही बैठक होईल.

दरम्यान, या प्रस्तावास अद्यापपर्यंत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर तसेच सध्याचा भारताचा कर्णधार विराट कोहली, नॅथन लायन यांनी देखील आयसीसीच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.