पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते या दौऱ्यात आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि इंडिया आघाडीतील अन्य नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नितीशकुमार अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीला गेले आहेत.
नितीशकुमार यांनी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते. या महिन्याच्या अखेरीस मुंबईत होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीपूर्वी नितीशकुमार विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या दिल्ली भेटीचा अधिक तपशील मिळू शकलेला नाहीं पण ते कॉंग्रेसच्या नेत्यांशीही भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.