नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून डच्चू देण्यात आला आहे. गडकरी यांना केंद्रीय संसदीय मंडळातून हटवण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा देखील रंगल्या आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या स्वपक्षीय नेत्यांना मोदी दूर करत असल्याचे देखील चर्चिले जात आहे. केंद्रीय संसदीय मंडळातून हटवल्यानंतर नितीन गडकरी ( nitin gadkari ) नाराज असून ते काँग्रेसचा हात पकडणार असल्याचं देखील बोललं जातंय. अशातच आज खुद्द नितीन गडकरी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ( nitin gadkari on joining congress )
काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, पहा वेळापत्रक
नागपूर येथे ( Nagpur ) आयोजित एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी ( nitin gadkari ) यांनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा स्पष्टपणे नाकारल्या आहेत. गडकरी यांनी यावेळी एक जुना किस्सा देखील सांगितला आहे. “जेव्हा मी विद्यार्थी नेता होतो, तेव्हा काँग्रेस नेते श्रीकांत जिचकर यांनी मला चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की मी एकवेळी विहीरीत उडी मारेल. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा मान्य नाही.” असे गडकरी यांनी स्पष्ट केले. ( nitin gadkari on joining congress )
दरम्यान, नितीन गडकरी ( nitin gadkari ) हे आपल्या झपाट्याने कामे मार्गी लावण्याबरोबरच आपल्या स्पष्टवक्ते स्वभावासाठी देखील ओळखले जातात. टीका करत असताना ते आपल्या निशाण्यावर विरोधीपक्षातला नेता आहे की स्वपक्षातला याचा मुलाहिजा बाळगत नाहीत. गडकरी यांनी अनेकदा आपल्याच सरकारच्या धोरणांचे देखील चांगलेच वाभाडे काढल्याचे पाहायला मिळाले आहे.
PM मोदींच्या रोड शोचे स्वागत करत मुस्लिम बांधवानी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा Video Viral
अशातच २०२४ च्या लोकसभा निवडणुका समीप येत असतानाच गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून हटवण्यात आले आहे. गडकरी यांच्यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना देखील डच्चू देण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ हे देखील संसदीय मंडळातून हटवल्यानंतर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणीही आपली नाराजी जाहीर केलेली नाही.