2012 या वर्षी दिल्ली मधील (निर्भया) घडलेल्या घटनेने संपूर्ण देश चिंतीत होता. कैंडल मार्च, मोर्चे, दु:खत भावना, चर्चा झाले…पण हळूहळू सर्व काही विसरु लागलो. परंतु पीडीत निर्भया च्या आई-वडीलांसाठी हे विसरणे अशक्य होते. 7 वर्षे 3 महिने न्याय मिळे पर्यत लढत राहिले.
दिल्लीतील निर्भया बलात्कार खून प्रकरण आरोपींना फासावर लटकविले. 38 वर्षा पूर्वी तिहार कारागृहात 1982 साली रंगा आणि बिल्ला या कारागृहात फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर 20 मार्च 2020 रोजी चार आरोपींना फाशी देण्यात आली. या दिवसांसाठी पीडीत निर्भया च्या पालकांना 7 वर्ष 3 महिने प्रतिक्षा करावी लागली. हैदराबाद प्रकरण सर्वांच्या लक्षात असून निर्भया आणि पालकांना आरोपींचा एनकाउटर करून काही महिन्यात न्याय मिळवून दिला. अशा प्रकारां मध्ये गुन्हेगारांना फाशी/ एनकाउटरची शिक्षा योग्य आहे. फाशी/ एनकाउटर ची शिक्षा दुर्मिळ गुन्हयासाठी दिली जाते.
ही शिक्षा देताना “पुढच्याच ठेच मागचा शहाणा “या तत्वानुसार भविष्यात असे कृत्य करू नये असा संदेश अप्रत्यक्षपणेे दिला जातो. निर्भया प्रकारातील आरोपींना फाशी होई पर्यंत वाट पाहावी लागते. न्यायव्यवस्थेला न्यायालयाच्या कर्तव्याचे पालन करावे लागते, न्याय व्यवस्थेने आरोपींनाही काही अधिकार दिले आहेत; न्यायिक बाजू मांडण्याचा हक्क आरोपींना हक्क आहे. त्या मुळे न्याय देण्यात उशीर झाला आहे हे न्यायालयाच्या दृष्टिने योग्य आहे. फाशी देणे योग्य होते जेणेकरून कृत्ये करण्याचे प्रमाण कमी होईल पण शिक्षा होण्यास एवढे वर्ष लागू नये. शिक्षे पर्यतची सगळी प्रक्रीया एका वर्षात व्हायला पाहिजे तरच आरोपींना, लोकांना कायद्याचे भय राहिल उदाहरणार्थ हैदराबाद घटना…असे लवकरात लवकर शिक्षा देऊन असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत याचा निर्धार आपण केला पाहिजे. अशा केसेस मधील आरोपींनसाठी कायद्याच्या पळवाटा बंद झाल्या पाहिजेत याची दक्षता राज्य सरकारने, पोलिस न्यायालयाने घ्यावी. लवकर निर्णय घेतले तरच महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्न कमी होण्यास मदत होईल. कोणत्याही महिलेशी कसे वागावे याचे संस्कार पालकांनी आपल्या मुलांना दिले पाहिजे.
प्रतिक्षा करणारया आई वडीलांसाठी तसेच विनामूल्य केस लढणारे सीमा कुशवाह याचे श्रेय मोलाचे ठरते.
“वो लढती रही सालो तक
उसकी जंग आज कामील हुई
उसकी बेटी के कातील को
आज फाॅसी हुई”
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, तळेगाव दाभाडे