पुणे – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ सध्या अडचणीत सापडला आहे. निलेश साबळे, कुशल बद्रिके, भाऊ कदम अशा अनेक कलाकारांची तगडी टीम असणारा हा विनोदी शो मराठीमधील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात हे कलाकार रंगमंचावर विविध भूमिका वेगळ्या ढंगात सादर करून चाहत्यांचे तुफान मनोरंजन करतात.
दरम्यान, नुकत्याच (दि. ११ मार्च) प्रदर्शित झालेल्या एका भागात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून, या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला आहे. अशाप्रकारे दोन महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल या कार्यक्रमावर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली.
https://www.facebook.com/zeemarathiofficial/videos/685556992213549/
मात्र, या वादानंतर डॉ. निलेश साबळेने घडलेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे.
लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 13, 2020
निलेश म्हणाला कि, “सादर करण्यात आलेला स्किटमधला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. स्किटमध्ये वापरण्यात आलेला फोटो शाहु महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टीमधून ही चूक झाली असून… घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही क्षमस्व” असं तो म्हणाला.