चिंबळी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय डाक विभाग, खेड उपविभागीय कार्यालय यांच्या सहकार्यातून, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच परिषदेचे खेड तालुकाध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या संकल्पनेतून निघोजे गावात लोककल्याणकारी योजनांचे शिबिर ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.
10 वर्षांखालील मुलींच्या पालकांनी सुकन्या समृद्धी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी प्रोत्साहन म्हणून आशिष येळवंडे यांनी स्वखर्चातून खाते उघडून दिले. त्याचप्रमाणे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे आणि भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खुल्या करण्यात आल्या. सुकन्या समृद्धी योजनेची निघोजे गावातील पहिली लाभार्थी कन्या हिंदवी अजित येळवंडे हिला योजनेचे बॅंकखाते पालकांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कार्यालय डाक निरीक्षक प्रमोद भोगाडे, डाक आवेक्षक विठ्ठल डोंगरे, पुणे ग्रामीण विभागाचे डेव्हलपमेंट ऑफिसर व्यंकटेश देशपांडे, सहाय्यक शाखा डाकपाल श्री विकास राऊत, निघोजे डाक विभागाचे शाखा डाकपाल भावेश फडतरे, कुरुळी डाक विभागाच्या शाखा डाकपाल अस्मिता थोरात, कोयाळी शाखा डाकपाल स्वप्निल निगडे, सुनिल अभंग (पाबळ एस), शिवाजीराव हजारे (पाबळ एस), सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच नम्रता येळवंडे, रामदास येळवंडे, जितेंद्र आल्हाट, सदस्य चंद्रकांत बेंडाले, रिठाबाई सोनवणे, सुनिता शिंदे, युवा उद्योजक अमित येळवंडे, ग्रामपंचायत कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.