इसिसच्या तळांवर तामिळनाडूत एनआएयएचे छापे

चेन्नई : हिंदुत्ववादी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामिळनाडूत सहा ठिकाणी छापे टाकले. कोईमतूर येथील इसिसच्या मॉयुलशी संबंधित दोन ठिकाणी एनआयएने गुरुवारी छापे टाकले.

पाच सदस्यांच्या पथकाने जीएमनगर येथील निसारच्या घरावर आणि सौरीदिन याच्या कलॉरीपेट येथील स्थळावर छापे टाकले. एनआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोवाई, इलायनगुडी, त्रिची, कयालपट्टीमानाम आणि नादपट्टीनम येथे हे छापे टाकण्यात आले. या हत्येच्या कटानाची एएनआयने स्थानिक पोलिसांना जुलै महिन्यात माहिती दिली होती.

सप्टेंबरमध्ये संपत, हिंदु मुन्नानी नेते मुकामबिकाई मनी, शक्ती सेनेचे अंबु मारी यांच्या हत्येचा इसिसपासून प्ररणा घेऊन रचलेला कट एनआयने उधळून लावला आहे. दक्षिण भअरतातील धर्मांध युवकांची अणि दहशतवादी संघटनांची माहिती एनआयए गोळा करत आहे.

दरम्यान देशातील सर्वाधिक इसिसची नेटवर्क तामिळनाडूतून उद्‌धवस्त करण्यात आली आहेत. इसिसच्या 127 हस्तकांना 2014 पासून ताब्यात घेतले आहे. त्यात तामिळनाडूतील 33 जणांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.