मुंबई – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. तर, दुसरीकडे सोशमीडियावर नेटकऱ्यांनी या प्रसंगासाठी एक भन्नाट पर्याय सुचवला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तो पर्यंत अभिनेते ‘अनिल कपूर’ यांना मुख्यमंत्री करण्याच्या सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. नायक चित्रपटात अनिल कपूर यांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री ही भूमिका साकारली होती. त्यांचा हा एक दिवसाचा कार्यकाळ पूर्ण देशानं बघितला आणि त्याच जोरदार कौतुकही केलं.
“महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी कोणता मार्ग निघत नाही तो पर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवा, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काय विचार आहे तुमचा?” असं ट्वीट एका युजरनं केलं असून, त्या ट्विटवर अनेक अनेकांनी रिप्लाय करत “हा सल्लादेखील चुकीचा नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, या अनिल कपूर यांनी देखील मजेशीर उत्तर दिलं आहे. ‘मी नायकाचं ठीक आहे’. असं कपूर यांनी म्हंटल आहे.
मैं nayak ही टीक हूँ ?@vijaymau https://t.co/zs7OPYEvCP
— Anil Kapoor (@AnilKapoor) October 31, 2019