बारामती (प्रतिनिधी) : माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदावरुन आजी-माजी चेअरमन व संचालकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीने घेतलेला अध्यक्ष पदाचा पदभार बेकायदेशीर असुन कारखान्याचे विद्यमान चेअरमन असल्याचा दावा प्रतिदावा दोन्ही संचालक मंडळाच्या,चेअरमनच्या वतीने रंजन तावरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारखान्याच्या अध्यक्षपदाचा स्वीकारलेला पदभार उच्च न्यायालय आणि साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार स्वीकारल्याचे सांगितले आहे. तर रंजन तावरे यांनी बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे यांनी अध्यक्ष,उपाध्यक्षपदाचा स्वीकारलेला कार्यभार बेकायदेशीरपणे असुन उच्च न्यायालयाचा अवमान करणारा आहे.
कारखान्याच्या विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना रंजन तावरे म्हणाले, कोरोना विषाणुजन्य परीस्थितीमुळे लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरीम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत. त्यामुळे माळेगांव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पुर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत. शनिवारी(दि ४) पहाटे साखर आयुक्तांना लेखी पत्र पाठविले आहे.मात्र, अद्याप याबाबत साखर आयुक्तांनी पत्राला कोणतेहि उत्तर दिलेले नाहि.त्यामुळे अद्याप कारखान्याच्या अध्यक्ष पदावर पदसिध्द अधिकार असल्याचे तावरे यांचे म्हणने आहे.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन तावरे यांनी उच्च न्यायालय,साखर आयुक्तांच्या निर्णयानुसार कायदेशीर रीत्या पदभार स्वीकारल्याचे रंजन तावरे यांचे कारखान्याच्या गौरवाला गालबोट लागेल, असे त्यांचे कृत्य आहे.
कारखान्याचे संचालक योगेश जगताप म्हणाले कि, सहकाराचा अनुभव असणारे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी आज नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे यांच्या अध्यक्षते खाली संचालक मंडळाच्या बैठकीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहु शकत नसल्याचे लेखी पत्र दिलेले पत्र म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षांना मंजुरी दिल्यासारखेच आहे. रंजन तावरे यांनी गुरुंचा अनुभवाचा मान राखावा,असा टोला संचालक जगताप यांनी लगावला आहे. यावेळी उपाध्यक्ष तानाजी कोक रे यां्च्यासह नवनिर्वाचित संचालक नितीन सातव,मदन देवकाते,सुरेश खलाटे, अनिल तावरे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसची बाजु मांडली.