सातारा : जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले. मार्केट यार्ड परिसरातील स्वामी समर्थ एजन्सीसमोर २० ते २५ लोक गर्दी करून उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी तेथे घेतली. दुकान मालक गणेश मोरे (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी संचारबंदी असतानाही दुकानासमोर सोशल डिस्टन्स ठेवून विक्री केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना जुना मोटार स्टॅन्ड परिसरात घडली. परवेज चिकन सेंटर पोलिसांना उघडे दिसले. दुकानासमोर कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाय योजना केल्या नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दुकानाचे मालक तन्वीर शेख आणि कामगार मोहसिन शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे.