सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत रूग्णालयाने दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली – रक्तदाबाच्या समस्येमुळे अपोलो रूग्णालयात दाखल झालेले सुपरस्टार रजनीकांत यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती शनिवारी रुग्णालयाने दिली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी रजनीकांत यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतलीय. रजनीकांत लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रक्तदाब अद्याप वाढला असला तरी शुक्रवारच्या तुलनेत तो अधिक नियंत्रणात आहे. रजनीकांत यांची अनेक प्रकारची तपासणी करण्यात आली आहे. अहवालामध्ये कोणतीही भितीदायक गोष्ट आढळली नाही. शनिवारी आणखी काही तपासण्या होणार आहेत, ज्यांचे अहवाल संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील.

रजनीकांत यांना दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये बदल केले जात आहेत तसेच त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले असून इतरांनी भेटण्यास परवानगी नाकारली आहे. तसेच आजचे तपसणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी रक्तदाबात चढ-उतार झाल्यानंतर रजनीकांत यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. 13 डिसेंबरपासून त्यांचे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यांची करोना तपासणी देखील करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. राजकीय क्षेत्रासह मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.