जळगाव – भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. खडसे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत ‘होय, मला ईडीची नोटीस मिळाली, असा खुलासा केला आहे.
“उद्याच्या बैठकीत कोणताही तोडगा सरकारने काढला नाही तर…” – आंदोलक शेतकऱ्यांना शरद पवारांचा शब्द
ईडीची नोटीस आल्यानंतर मला राज्यभरातून फोन येत आहेत. त्यातून मला सहानुभूतीच मिळत आहे. लोकांना असे वाटते की हा एक प्रकारचा माझ्यावर अन्याय आहे. वारंवार चौकशा लोकांना आवडलेल्या दिसत नाहीत, मात्र काही निर्णय असतात त्या आधीन राहून काम करायचे असते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
“चौकशीची एवढी भिती कशासाठी?” – भाजप नेत्याचा संजय राऊतांना रोखठोक सवाल
खडसे हे नुकतेच राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यांना नोटीस बजावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कालपासून खडसे यांनी याबाबत मौन धरले होते. मात्र अखेर खडसे यांनी मौन सोडले असून नोटीस मिळाल्याचा खुलासा केला आहे.
काय म्हटले आहे नोटीसमध्ये –
एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबर रोजी चोकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आला आहे. पुणे येथील भोसरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ही नोटीस बजावल्याचे बोलले जात आहे.
ईडी लावली तर सीडी लावेन..
एकनाथ खडसे हे अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपमधून बाहेर पडलो तर ईडीची चौकशी होऊ शकते हा अंदाज त्यांना आधीच होता. राष्ट्रवादी प्रवेशसमारंभावेळीच ‘त्यांनी ईडीची चौकशी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा भाषणातून दिला होता. त्यामुळे आता एकनाथ खडसे सीडी लावणार का? आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“ठाकरे सरकारकडून तुकडे-तुकडे गँगची पाठराखण”