सातारा – जिल्ह्यात काल (शनिवार, दि. 20) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 327 नागरिक करोना संक्रमित झाले आहेत, तर गेल्या 24 तासांमध्ये तीन बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली.
करोनाचा धोका वाढत असताना, करोनाबळी रोखण्यातही प्रशासनाला अपयश येत आहे. सातारा व फलटण हे तालुके आधीच रेड झोनमध्ये असून, कराड, खंडाळा, वाई, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमध्येही रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
सातारा शहरात सैनिक स्कूल नऊ, केसकर कॉलनी (महादरे रस्ता) पाच, सदरबझार, मल्हार पेठ, गोळीबार मैदान, राधिका रोड प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, रामाचा गोट, गडकर आळी, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ, देवी कॉलनी, शाहूपुरी, गेंडामाळ, दौलतनगर, करंजे प्रत्येकी एक, इतरत्र 15,
सातारा तालुक्यात कोंडवे, सैदापूर, नुने, कामठे, दरे, शिवाजीनगर, विकासनगर, शिवथर प्रत्येकी तीन, वर्ये, जकातवाडी, कोटेश्वर, कातवडी बुद्रुक प्रत्येकी दोन, संगमनगर, धनगरवाडी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, वाढे, नेले, माहुली, आरळे, कुसुंबी, किडगाव, कृष्णानगर, वेण्णानगर, बारावकरनगर, अतीत, गवडी प्रत्येकी एक, कराड शहरात शिवाजी चौक, शुक्रवार पेठ, कार्वे नाका प्रत्येकी एक, इतरत्र पाच,
कराड तालुक्यात कार्वे पाच, मसूर तीन, मलकापूर दोन, सैदापूर, हजारमाची, आगाशिवनगर, वडगाव हवेली, कालगाव प्रत्येकी एक, फलटण शहरात ब्राह्मण गल्ली, बुधवार पेठ प्रत्येकी तीन, लक्ष्मीनगर, मंगळवार पेठ, स्वामी विवेकानंदनगर प्रत्येकी दोन, सगुणामातानगर, रविवार पेठ, शुक्रवार पेठ प्रत्येकी एक, इतरत्र तीन, फलटण तालुक्यात कोळकी सहा, जाधववाडी, साठे प्रत्येकी चार, गोखळी दोन, शिवाजीनगर, नवा मळा, खांडज, फरांदवाडी, अहिरे, जिंती, खुंटे, सोमंथळी, राजुरी, ठाकुरकी, आसू, तरडगाव, जिंती, साखरवाडी, सोनवडी, तिरकवाडी प्रत्येकी एक,
माण तालुक्यात म्हसवड तीन, पिंगळी, बोराटवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात शिरवळ 11, लोणंद पाच, भाटघर दोन, शेडगेवाडी, वाहगाव, सुखेड, पळशी, भादे प्रत्येकी एक, वाई शहरात गणपती आळी, सिद्धनाथवाडी प्रत्येकी दोन, बावधन नाका, सोनजाईनगर प्रत्येकी एक, इतरत्र एक, वाई तालुक्यात भुईंज दोन, वासोळे, बावधन, पांडेवाडी, नागेवाडी, कडेगाव, निकमवाडी, मयुरेश्वर, कवठे, वेळे प्रत्येकी एक,
जावळी तालुक्यात मेढा, रायगाव, आंबेघर, हुमगाव, रायगाव प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज चार, मायणी, पुसेगाव प्रत्येकी तीन, जाखणगाव दोन, खटाव, येरळवाडी, रेवलकरवाडी, गारवडी, खातगुण, तडवळे, पुसेसावळी, बोंबाळे प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव चार, चौधरवाडी, पिंपोडे बुद्रुक, किन्हई प्रत्येकी तीन, वाठार, देऊर, वाठार स्टेशन प्रत्येकी दोन, गोगावलेवाडी, आसनगाव, भाटमवाडी, सर्कलवाडी, तडवळे, टाकाळे, नांदवळ प्रत्येकी एक,
महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर सहा, पाचगणी पाच, गोडवली तीन, मेटगुताड एक, पाटण तालुक्यात वाडीकोठावडे, अडुळ प्रत्येकी एक, इतर 12, बाहेरील जिल्ह्यातील सांगली तीन, असे 327 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांच्या एकूण संख्येने 62 हजारांचा आकडा ओलांडला असून, मृतांची संख्या 1883 झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वाईतील 60 वर्षीय महिला, भिलार, ता. महाबळेश्वर येथील 57 वर्षीय पुरुष व सैदापूर, ता. कराड येथील 41 वर्षीय महिला, अशा एकूण तीन बाधितांचा मृत्यू झाला.