पुणे – व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकला पिस्तुलाच धाक दाखवून 50 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणात आणखी एकाचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. संदेश अनंत वाडेकर (वय -33 रा. रो. हाऊस, चिखली,) असे त्याचे अर्ज नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. यावलकर यांनी हा आदेश दिला. त्याने गुन्हतील केमेरा लपविला होता. तो त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दत्तवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केलेले मंगलदास बांदल यांनाही अटक करण्यात असून त्यांना 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आशिष हरिश्चंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर), रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) आणि संदेश वाडेकर या चौघाना अटक करण्यात आली होती. रूपेश ज्ञानोबा चौधरी याचा नुकताच जामीन अर्ज न्यायालयने फेटाळला आहे. फिर्यादीच्या वतीने ऍड. पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले. तर, सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी युक्तिवाद केला.
तपास प्राथमिक स्वरूपात झाला असून, अजून पूरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. वाडेकर याला जामीन दिलास साक्षीदारवर दबाव टाकण्याची अथवा पुरव्यायमध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी फिर्यादी यांच्या वतीने पुष्कर दुर्गे आणि अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी करण्यात आली होती.