पुणे – एका 19 वर्षीय माथाडी कामगाराने महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करुन पळ काढला. मात्र तरुणीने धाडसाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. तीच्या मदतीला तीचे काका आणि स्थानिक नागरिकही धाऊन आले. मात्र त्याने जवळील वस्तरा काढत तरुणीच्या काकाला जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याही परिस्थितीत त्याला पकडून चोप देत खडक पोलिसांच्या ताब्यात दिले.
साहिल सुशिल अडागळे (19,रा. गंज पेठ ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने फिर्याद दिली आहे. पिडीत तरुणी गुरुवार पेठेतील एका सोसायटीमध्ये रहाते. ती कामानिमीत्त बाहेर जात असताना पार्किंगमधून गाडी बाहेर काढत होती. याच वेळी तेथे साहिल आला. त्याने अचानक पिडीतेच्या प्रायव्हेत पार्टला हात लावला.
यामुळे घाबरेल्या पिडीतेने आरडा ओरडा केला. तीने आरडा ओरडा केल्याने आरोपी साहिलने तेथून पळ काढला. मात्र पिडीतेने दुचाकीवरुन त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. तीच्या मदतीला तीचा काका आणि तेथे उपस्थित नागरिकही धावून आले. त्याला पकडून खडक पोलीस स्टेशन येथे नेत असतानाच त्याने खिशातील वस्तरा काढून पिडीतेच्या काकावर वस्तरा काढून जखमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी त्याला फटकावून वस्तरा काढून घेतला. खडक पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पवार करत आहेत.