पाचगणी प्रतिनीधी – शरद पवारांना धक्का देत अजित पवार यांच्या बंडाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील केद्रबिंदु मानल्या जाणाऱ्या वाई महाबळेश्वर खंडाळा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील अखेर नाट्यमय घडामोडीनंतर अजित पवार याच्या गटात सामील झाले आहेत. मुबंई येथे देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आमदार मकरंद पाटीस यांचा प्रवेश मतदार संघातील कार्यकर्त्यांना विचारुन घेण्यात येणार असल्यामुळे दोन दिवसानंतर आमदार मकरंद पाटील अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदार संघातील बहुतांशी कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटलांना अजित पवार यांच्या गटात सामील व्हावे म्हणून विनवणी केल्याने आमदाक मंकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देवगिरी या उपमुख्यमत्र्यांच्या निवासस्थानी अजित पवार यांच्या गटात जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याच्या राजकीय भूकंपात शरद पवार यांच्या गाडीत बसुन कराड पर्यंत प्रवास करणारे मकरंद पाटील अखेर अजित पवारांच्या गटात सामिल झाल्यामुळे शरद पवारांना धक्का मानला जात आहे. आमदार मकरंद पाटील यांना मंत्रीपद राखून ठेवण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी उपस्थितांना जाहीररित्या सांगितले. आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार यांची उत्सुकता आता मतदार संघातील जनतेला लागलेली आहे. यावेळी माजी सभापती संजय गायकवाड, नाना शिंदे, नितीन भिलारे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.