पुणे – हजारो वाचकांच्या, हितचिंतकांच्या, स्नेह्यांच्या हृद्य भेटीने दैनिक “प्रभात’चा 92 वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत कौटुंबिक वातावरणात गुरूवारी सायंकाळच्या रम्य वातावरणात साजरा करण्यात आला. गेल्या नऊ दशकांहून जास्त काळ दैनिक “प्रभात’ने वाचकांच्या मनात कुटुंबातील सदस्याप्रमाणेच स्थान निर्माण केले आहे, याची प्रचिती या स्नेहसोहळ्यातून आली. शहरातील सर्वसामान्य वाचकांपासून ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून, “प्रभात’च्या शतकी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
शनिवार पेठेतील न्या. महादेव गोविंद रानडे बालक मंदिराच्या प्रांगणात या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान, रांगोळी रेखाटण्यात आली होती. याशिवाय “प्रभात’च्या नारायणपेठ येथील कार्यालयालाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती, याशिवाय मनमोहक रांगोळ्यांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्याच वाटचालीचे साक्षीदार होण्यासाठी आणि शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी या खास स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सनईच्या सुरात रानडे बालक मंदिरात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला स्नेहमेळाव्याला प्रारंभ झाला. प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, महादेव कोंढरे, सुहास दगडे, सुनील चांदेरे, माजी नगरसेविका रुपाली धाडवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, व्यवस्थापक रविकुमार इंडी, जाहिरात मुख्य व्यवस्थापक प्रवीण पारखी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
शुभेच्छांबरोबर आग्रहाने दिलेला अल्पोपहराचा आस्वाद हे “प्रभात’चे वैशिष्ट्य आहेच. त्यामुळे गप्पांबरोबर त्याचाही मनमुराद आस्वाद उपस्थितांनी घेतला. या सोहळ्यात, राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबर व्यापार, उद्योग, विधी, क्रीडा, प्रशासन, जाहिरात, पत्रकारिता, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी “प्रभात’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्यात आमदार भीमराव तापकीर, आमदार चेतन तुपे, आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार रमेश बागवे आणि मोहन जोशी, माजी आमदार अनंत गाडगीळ, विजय काळे, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मनसे शहराध्यक्ष बाबु वागस्कर, प्रदीप गारटकर, चंद्रकांत मोकाटे, अण्णा थोरात, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त संदीप गील, प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, सहकार आयुक्त अनिल कवडे, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, नोंदणी सहमहानिरीक्षक नंदकुमार काटकर, महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, प्रदीप कंद, सुरेंद्र जेवरे, राहुल शेवाळे, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. रमेश भोसले, डॉ. भगवान पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, रवींद्र रणसिंग, नवनाथ भोसले, ऍड. अभय छाजेड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, पुणे बार असो. अध्यक्ष पांडुरंग थोरवे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे सदस्य राजेंद्र उमाप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, एसटीचे वाहतूक व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे, डॉ. श्री व सौ. संजय चोरडिया, शैलेश पगारिया यांच्यासह मान्यवरांनी यावेळी “प्रभात’ला शुभेच्छा दिल्या.