नवी दिल्ली – देशात कोविड रुग्णांचे प्रमाण आता आणखी खाली आले असून देशात गेल्या 24 तासांत कोविडचे 1 लाख 86 हजार 364 रुग्ण आढळून आले आहेत. कोविड रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली येण्याची या माहिन्यातील ही दुसरी वेळ आहे. गेल्या 44 दिवसांतला हा नीचांक आहे, असे आरोग्यमंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 9 टक्के इतके खाली आले असून आज लागोपाठ चौथ्या दिवशी हे प्रमाण दहा टक्क्यांच्या खाली आले आहे. देशातील सक्रिय बाधितांचे प्रमाणही 8.50 टक्क्यांवर आले आहे. सध्या देशातील सक्रिय बाधितांची एकूण संख्या 23 लाख 43 हजार 152 इतकी आहे. कोविडचा रिकव्हरी रेट 90.34 टक्क्यांवर आला आहे.