बंगळुरू – भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष आता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेकडे लागले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलेल्या “चांद्रयान-3’चा सॉफ्ट लॅंडिंगच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. आता “चांद्रयान-3’ने आज चंद्राच्या पाचव्या आणि शेवटच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे.
“चांद्रयान-3’ची आज चौथ्यांदा आपली कक्षा बदलली आहे आणि आता ते जवळजवळ गोलाकार कक्षेत फिरत आहे. चांद्रयान-3ने आतापर्यंत 153 किमी X 163 किमीच्या चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत पोहोचले आहे. आता चांद्रयान-3 आपल्या मिशनच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 150 किमी अंतरावर आहे. आज सकाळी इस्रोने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागापासून अंतर कमी करण्यासाठी कक्षा कमी केली.
“चांद्रयान-3′ 153 किमी x 163 किमीच्या पाचव्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेचे नाव मॅन्युव्हर आहे. या अंतर्गत, अंतराळ यानाच्या इंजिनचा वापर करून, ते एका विशिष्ट मार्गाने ढकलले जाते. ज्यामुळे त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनतो. आता हे यान सॉफ्ट लॅंडिंगसाठी तयार होईल.
17 ऑगस्ट रोजी, प्रोपल्शन आणि लॅंडर मॉड्यूल वेगळे केले जातील. लॅंडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर आणि अंतराळयान 100 किमी x 30 किमीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सॉफ्ट लॅंडिंगची प्रक्रिया सुरू होते. लॅंडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर पोहोचतो. त्याच्या सुरक्षित लॅंडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे.
23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लॅंडिंग करणार
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ सांगतात की, चांद्रयान-3चा लॅंडर विक्रम 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडिंग करेल. विशेष म्हणजे, इंजिन बिघडले तरी अशा परिस्थितीतही चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडिंग होईल. सर्व सेन्सर आणि दोन इंजिन काम करू शकले नसले तरी सॉफ्ट लॅंडिंग सुनिश्चित केले जाईल, असा दावा इस्रो प्रमुखांनी केला आहे. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे सर्वात मोठे आव्हान इस्रोच्या टीमसमोर आहे.