प्रांताधिकार्यांनी घेतली आढवा बैठक
बारामती (प्रतिनिधी) – बारामती औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी तसेच कामगारांना पास देण्यात यावेत अशी मागणी बारामती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याच धर्तीवर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी मंगळवारी (दि. 28) आढावा बैठक घेतली.
त्यात त्यांनी एमआयडीसीचा पूर्ण आढावा घेतला. थांबलेल्या अर्थव्यवस्थेला ‘बुस्टर’ मिळावे यासाठी काही अटी व शर्तीवर बारामती एमआयडीसी 1 मे रोजी सुरू करण्याचा विचार असला तरी अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी औद्योगिक वसाहतीतील कर्मचारी व उद्योगपतींमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असल्याचे बारामती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले.
या आहेत अटी व शर्थी….
- कॅन्टोन्मेंटमधील कर्मचारी घेता येणार नाही
- 30 टक्के कामगारांवर कंपनी सुरू करायची
- कंपन्यांमध्ये तुर्तास दुचाकींना परवानगी नाही
- शासनानाचे सर्व आदेश पाळून कर्मचार्यांसाठी चारचाकी वाहनांची सोय करण्यात यावी