लोकसभा निवडणूकीचा पाचवा टप्पा: राज्यात सकाळी ९ पर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील आज शेवटच्या पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. राज्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. यात मुंबईतील सहाही मतदार संघाचा समावेश आहे.
नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच १३ लोकसभेच्या मतदानाने सांगता होईल.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यात ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी जाणून घेऊयात…
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के.
हेही वाचा:
“मुंबईकर सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावून…”; उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला विश्वास





