वर्धमान – पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राजू झा असे या भाजप नेत्याचे नाव आहे. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा गोळीबार बर्धमान जिल्ह्यातील शक्तीगढ भागात झाला. हल्लेखोरांनी गोळ्या झाडून तेथून पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते राजू झा हे दुर्गापूर येथील एक व्यापारी आहेत. ते कोलकात्याहून वर्धमानला जात होते. दरम्यान, हल्लेखोरांनी एका मिठाईच्या दुकानाबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यानंतर राजू यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कारमध्ये राजू झा यांच्यासह तिघेजण उपस्थित होते.
हल्लेखोरांचा हेतू अद्याप समजू शकला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस तपास करत आहेत. राजू झा यांनी 2021 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.