केंद्र सकारने सुरू केलेल्या आभा हेल्थ कार्ड योजनेच्या दुसर्या टप्प्याला नुकतीच उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधून सुरुवात झाली. याद्वारे नागरिकांना त्यांची हेल्थ हिस्ट्री डिजिटल स्परुपात एकत्र ठेवता येणार आहे. तसेच उपचारावेळी डॉक्टरांचाही आजाराचे निदान करताना वेळ वाचणार आहे.
डिजिटल हेल्थ कार्ड म्हणजे काय?
डिजिटल हेल्थ कार्ड आभा कार्ड म्हणूनही ओळखले जाते. हे एक प्रकारची रुग्णाची डिजिटल ओळखही असेल. ज्यामध्ये तुमच्या मेडिकल हिस्ट्रीची सर्व माहिती असते. हे कार्ड सरकारी आणि खाजगी दोन्ही रुग्णालयांमध्ये चालते. आभा कार्ड बनवल्यावर तुम्हाला 14 अंकी आयडी क्रमांक मिळेल. तसेच त्यात एक क्यूआर कोड असेल. ज्याद्वाररे ते स्कॅन करून तुमची वैद्यकीय माहिती वाचता येईल.
आभा कार्डसाठी कागदपत्रे –
आभा हेल्थ कार्ड तयार कण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्डशी लिंक केलेला मोबाइल नंबर, जन्म प्रमाणपत्राची प्रत, पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. याशिवाय रेशनकार्ड, बँक पासबुक, कायमस्वरूपी वास्तव्याचे प्रमाणपत्र यापासून बनवलेले एबीएचए कार्डही तुम्ही मिळवू शकता.
आभा कार्डचे फायदे –
सर्वत्र डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन जाण्याचे टेन्शन संपेल. यामध्ये तुमच्या रक्तगटापासून ते प्रयोगशाळेतील चाचण्या आणि सर्व चाचण्यांचे अहवाल असतील. याच्या मदतीने तुम्ही रुग्णालये, दवाखाने आणि विमा कंपन्यांसोबत वैद्यकीय नोंदी सहज शेअर करू शकाल. तातडीच्या उपचारांसाठी कधीही डॉक्टरांची वाट पाहावी लागणार नाही.
उद्देश –
आभा कार्ड तयार केल्यामुळे आजारी लोकांचे निदान, आरोग्य नोंदी, दवाखाने इत्यादींमध्ये त्यांचा डेटा डिजिटली शेअर करू शकतील. याद्वारे नागरिकांना त्यांची मेडिकल हिस्ट्री डिजिटली साठवता येईल. तसेच आजाराचे निदान करताना डॉक्टांना मदत होईल.