पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बुधवारी (दि. 15) नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार आघाडी घेतली. आज झालेल्या पदयात्रांमध्ये महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत एकजुटीचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात तरी नाना काटे यांनी वातावरण ढवळून काढल्याचे आज दिसून आले. यावेळी विद्यानगर, कृष्णा चौक येथे सभा घेण्यात आली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज सागर परदेशी जनसंपर्क कार्यालायपासून साई चौक, साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नवनाथ जगताप यांची भेट, सांगवीचा राजा म्हसोबा मंदिर, फेमस चौक, नवी सांगवी नवसाचा गणपती एम के चौक, शिवनेरी चौक, कृष्णा चौक, साईराज रेसिडेन्सी, ारामती मित्र मंडळ आदी ठिकाणी नागरिक व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. नाना काटे यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव बाळासाहे ठाकरे शिवसेना, कॉंग्रेस व आरपीआयसह (गवई गट) इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज (दि. 15) प्रभाग क्रमांक 45, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला. सदर यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसामिळाला. पिंपळे गुरव परिसरातील प्रत्येक मतदार आणि घरापर्यंत पोहोचत या पदयात्रेद्वारे काटे यांनी मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. पदयात्रेत महाविकास आघाडी प्रचार प्रमुख भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, सामाजिक कार्यकर्ते सागर परदेशी, तानाजी जवळकर, शाम जगताप, राजू लोखंडे, अरुण पवार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.