तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात झालेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नवीन समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे.
नवीन समर्थ विद्यालयाचा प्रणव वाघमोडे या विद्यार्थ्याने प्रवर्गात जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच, मृदुल भवर या विद्यार्थिनीने प्रवर्गात जिल्हा गुणवत्ता यादीत ३६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
आयुष पवार, श्रेयस माने, प्रणव पाटील हे विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत विद्यालयाचे एकूण १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश मस्के, शालेय समितीचे अध्यक्ष महेश शाह, संचालक सोनबा गोपाळे, प्राचार्या वासंती काळोखे, पर्यवेक्षक रेवप्पा शितोळे यांनी अभिनंदन केले.