नवी दिल्ली – नवे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते नौदल प्रमुख करमवीसिंग यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. हरिकुमार हे नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
गेले 39 वर्षे ते नौदलाच्या सेवेत आहेत. आयएनएस निशंक, आयएनएस कोरा, आयएनएस रणवीर,आयएनएस विराट अशा युद्धानौकांवरही त्यांनी प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. नौदलाच्या वेस्टर्न फ्लीटचे फ्लीट ऑपरेशन ऑफिसर म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
अमेरिका आणि ब्रिटन मध्ये त्यांनी नौदलाचे विषेश अभ्यासक्रम पुर्ण केले आहेत. त्यांना त्यांच्या आजवरच्या कार्याबद्दल परमविशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, आणि विशिष्ट सेवा मेडलने गौरवान्वित करण्यात आले आहे.