नेवासा (प्रतिनिधी) – नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीमध्ये गट – तट हा कुठलाही प्रकार नसून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात असलेली कुजबूज आणि काही मतभेद सामांजस्यपणे एकञ बसून दूर केले जातील ? अशी माहीती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी नेवासा शहरात असलेल्या पक्ष कार्यालयात मंगळवारी सकाळी ११ वाजता माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
यावेळी बोलतांना पेचे पुढे म्हणाले की, येत्या ९ मार्च रोजी भारतीय जनता पार्टीचा एक मेळावा आयोजित केला जाणार आहे या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी पेचे केले आहे पक्षात नवे – जुने व नाराज आणि नवीन कार्यकर्त्यांचा समन्वय घडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीचे ‘कमळ’ फुलविण्यासाठी नेवासा तालुक्यात पक्षकार्य केले जाईल अशी ग्वाही यावेळी पेचे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली यावेळी शहराध्यक्ष मनोज पारखे,निरंजन डहाळे आदी उपस्थित होते.
दोन दिवसांपुर्वी सोशल मीडियात पक्षाचे काम करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांनी पक्षात राहून पक्षातील नेत्यांचीच बदनामी करुन सर्वसामान्य जनतेत संभ्रावस्था निर्माण केलेली होती त्यामुळे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी गंभीर दखल घेत दोन कार्यकर्त्यांना पक्षातून डच्चू दिला असल्याचे पञक काढल्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पेचे यांनी सारवा – सारव करत पक्षात मतभेद नसल्याचे जाहिर केले असल्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्या आणि बंडाळी सुरु असल्याचे जनतेतून उघडपणे बोलले जीत आहे माञ पक्षात मतभेद नसल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.