नेवाशात गुरुवारपासून रस्ता वाहतुकीत बदल होणार!
नेवासा – आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी तीर्थक्षेत्र नेवासा येथे गुरुवारी (दि.१३) रोजी आज मोठी यात्रा भरत असल्याने माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येणार असल्याचा आदेश प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी काढला आहे.
आषाढी शुद्ध एकादशीच्या निमीत्ताने पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेल्या सर्व दिंड्या व लाखोंच्या संख्येने गेलेले भाविक नेवासा येथे आषाढी वद्य या माऊलींच्या कामिका एकादशीच्या निमित्ताने पैस खांबाच्या दर्शनाकरीता येत असतात.यापूर्वी कामिका एकादशीस श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदीर येथे अंदाजे ४ ते ५ लाख भाविकांनी दर्शन घेत असतात.
यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.त्यामुळे उद्या नेवासा फाटा,नेवासा बुद्रुक या रस्त्यावर पायी चालणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी रहाणार आहे तसेच शेवगाव ते श्रीरामपूर मार्गावरील वाहतूकीमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना वाहनाचा अडथळा निर्माण होवू नये म्हणून कामिका एकादशी निमित्त वाहतुक मार्गात बद्दल करण्यात आला आहे.
श्री.संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे. श्रीरामपूर – शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक (दि. १२ जुलै) रोजी रात्री ११ वाजेपासून (दि.१३ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत वळविण्यात येणार आहे
पर्यायी मार्गाने वाहने कशी वळविण्यात येतील ते पुढीलप्रमाणे
१) औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनांकरीता मार्ग- श्रीरामपुर वैजापूरमार्ग औरंगाबाद,श्रीरामपूर – टाकळीभान- नेवासा बुद्रुक भालगाव-गोधेगाव वाशिम टोका,शेवगावकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग श्रीरामपूर टाकळीभान नेवासा बुद्रुक भालगाव-गोधेगाव वाशिम टोका सिध्देश्वर मंदिर प्रवरासंगम,नेवासा फाटा कुकाणा-शेवगाव असा वळविण्यात येणार असल्याचे
प्रशासनाकडून सांगण्यात आले.