मुख्यमंत्री ठाकरेंचं भाषण होताच भाजप नेत्याचं ट्विट; म्हणाले, “…घरकोंबडा”

मुंबई – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा मर्यादित नेतेमंडळी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री ठाकरे व राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरु आहे.

अशात आज उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजच्या भाषणामध्ये चौफेर टोलेबाजी केली. शिवसेना व राज्य सरकारच्या टीकाकारांनाही त्यांनी चांगलेच सुनावले.


अशातच आता उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टोलेबाजीवर भातखळकर यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये भातखळकर लिहतात, “रावण में लाख बुराइयां थी……… पर वो घरकोंबडा नहीं था.” 

भातखळकर यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ तास काम करतात व ६ चं तास झोपतात. मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान जेवढे तास झोपतात निदान तेवढे तास तरी काम करावं.’ अशा आशयाची टीका केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.