मुंबई – आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारी गायिका नेहा कक्कर सर्वांच्या मनावर राज्य करत आहे. ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते. अशात नेहाचे लवकरच घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहे.
ही बातमी वाचून नेहाचे चाहतेही संतापले आहेत. नेहाने यापूर्वी तिचा वाढदिवस साजरा केला आहे, परंतु तिचा पती रोहनप्रीत सिंग या खास दिवशी दिसला नाही. रोहनने पार्टीला हजेरी लावली नाही तसेच त्याने शुभेच्छा दिल्या. तेव्हापासून दोघांचे चाहते या जोडप्यात काही बिनसलंय का असा अंदाज लावत आहेत.
नेहा कक्करने 7 जून रोजी तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या जवळच्या लोकांना खास पार्टीही दिली. तिने या पार्टीचे व्हिडिओ , फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, पण यामध्ये फोटोंमध्ये रोहन कुठेच दिसत नव्हता. दरम्यान, आता हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा आहे.
यासोबतच दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मात्र, या दोघांचे पुढचे पाऊल काय असेल याबाबत कोणतीही विशेष माहिती समोर आलेली नाही. नेहा आणि रोहन प्रीत यांनीही याप्रकरणी मौन बाळगले आहे. रोहन प्रीत आणि नेहा 2020 मध्ये लग्न झाले. तेव्हापासून दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.