मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘नेहा कक्कड’ने जगभरातील अनेक गायकांना आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने धोबी पिछाड दिला आहे. नेहाने आता एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून उभारी घेतली असून जगभरातील लोकांना तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
नुकतंच 24 ऑक्टोबर रोजी नेहा कक्कर रायझिंग स्टार फेम गायक रोहनप्रीत सिंगसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नेहा आणि रोहनप्रीत सातत्याने चर्चेत आहेत. यांचा दोघांचा विवाह सोहळा देखील मोठ्या उत्सवात पार पडला असून, त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.
View this post on Instagram
दरम्यान, आता नेहा कक्कर बद्दल आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोची सध्या तुफान चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे.
शेअर केलेल्या या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून, फोटोला “खयाल रखा कर’ असं कॅप्शन दिलं गेलं आहे. या फोटोला नेहाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल” अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे.