नवी दिल्ली – अदानी समूहाने शुक्रवारी सांगितले की त्यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनी समुहाचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांच्याकडून एनडीटीव्ही मधील 27.26 टक्के इक्विटी शेअर्सही विकत घेतले आहेत.
एनडीटीव्हीचे अन्य शेअर्स अदानी समुहाने या आधीच स्वताच्या नावावर केले आहेत. परंतु तरीही रॉय पती-पत्नीकडे 32.26 टक्के शेअर्स उरले होते त्यातील 27.26 टक्के शेअर्स अदानी यांनी घेतल्याने एनडीटीव्हीवर अदानी समुहाची पुर्ण मालकी झाली आहे.
अदानी समूहाने रॉय कुटुंबियांकडील शेअर 342.65 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतले. अदानी समुहाने एनडीटीव्ही बोर्डाच्या संचालक मंडळावर संजय पुगलिया आणि सेंथल सिन्नीया चेंगलवरायन यांची संचालक म्हणून गेल्याच आठवड्यात नियुक्ती केली आहे.