वायनाडमध्ये राहुल गांधींविरोधात “एनडीए’चे तुषार वेल्लापल्ली

नवी दिल्ली – केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात भारत धर्म जन सेना या भाजपच्या मित्रपक्षाचे तुषार वेल्लाप्पल्ली हे निवडणूक लढवणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज ही घोषणा केली.

“भारत धर्म जन सेना या पक्षाचे अध्यक्ष तुषार वेल्लाप्पल्ली हे वायनाडमध्ये “एनडीए’चे उमेदवार असणार आहेत. वेल्लाप्पल्ली हे तरुण आणि प्रभावशाली नेते आहेत. विकास आणि सामाजिक न्यायाप्रती आमची कटिबद्धता त्यांनी अनुसरली आहे. त्यांच्या समवेत “एनडीए” केरळमध्ये राजकीय पर्याय म्हणून पुढे येईल.’ असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

एझहवा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या श्री नारायण धर्म परिपालन योगम या प्रभावी संघटनेचे सरचिटणीस वेल्लाप्पल्ली नाटेशन यांचे तुषार वेल्लाप्पल्ली हे चिरंजीव आहेत. मागासवर्गीयांचे प्रतिनिधी आणि केरळमधील लोकप्रिय नेते अशी तुषार वेल्लाप्पल्ली यांची ओळख आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.