पुणे -राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे शहर अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी उपमहापौर दीपक मानकर यांची निवड करण्यात आली. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर पुण्यात आल्यावर मानकर यांनी शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर लालमहाल येथील राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केसरीवाडा येथे मानाचा पाचवा गणपती व लोकमान्य टिळक यांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बाबुराव चांदेरे, रूपालीताई ठोंबरे-पाटील, दत्ता सागरे, बाळासाहेब बोडके, विजय डाकले, हर्षवर्धन मानकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“अजित दादा आगे बढो…हम तुम्हारे साथ है,’ “दीपक भाऊ आगे बढो…हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी दीपक मानकर यांची भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.