पडळकरांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून समर्थन

पोलिसांवर कारवाई करा- सोलनकर

बारामती- विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या 22 योजना मार्गी लावण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी पोलिसांनी दडपशाही केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांना समर्थन दिले आहे.
धनगर आरक्षण आणि तत्कालीन भाजप सरकारच्या काळात 22 योजना लागू केल्या होत्या. 1000 कोटी देण्याची तरतूदही केली होती. त्यानंतर महविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले.

एक वर्ष पूर्ण झाले तरी योजनांसंबंधी सरकारने साधी चर्चाही केली नाही. हा धनगर समाजावर अन्याय आहे, हाच मुद्दा घेऊन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा सभागृहाच्या बाहेर धनगर समाजाची वेशभूषा परिधान करीत ढोल वाजवून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी धनगर समाजाच्या मागण्यांचे बोर्ड तोडून टाकले. आंदोलन करण्यास मनाई केली.

एखादा समाजाचा नेता आंदोलन करीत असेल तर पोलिसांनी अशी दडपशाही करणे चुकीचे आहे, यामध्ये धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, अशी कृती करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी मागणी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.