नवी दिल्ली – ओडिशातील मयूरभंजमध्ये एका तरुणाने झाडाच्या खोडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अप्रतिम चित्र कोरलं आहे. तरुणाने अनोखी शक्कल लढवली असून मोठा संदेश दिला आहे. समरेंद्र बेहरा असं या कलाकाराचं नाव असून त्याने चक्क एका झाडाच्या खोडावर पंतप्रधानांचं चित्र कोरलं आहे. समरेंद्र याने येथील सिमिलीपाल नॅशनल पार्क मधील झाडांच्या खोडावर हे चित्र रेखाटलं आहे.
जंगलात अवैध पद्धतीने होणारी वृक्षतोड थांबावी हा अनोखा संदेश समरेंद्र बेहरा या युवकाने चित्रातून देण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदीचं याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या तरुण कलाकाराने सिमिलीपाल नॅशनल पार्कमध्ये मोदींचं हे चित्र एका झाडावर कोरल्याची माहिती त्याने दिली आहे. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारे झाडावर नरेंद्र मोदी यांचं चित्र कोरलं आहे.
परदेशात अनेकदा कलावर झाडावर चित्र काढून सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न करत संदेश देत असतात.