यवत -पिंपळगाव (ता. दौंड) येथील विकास सोसायटीची निवडणूक सोमवारी (दि. 4) पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर सहकारी पॅनेल, तर विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा पॅनेलची मोर्चे बांधणी पॅनेलप्रमुखांनी केली होती. या सोसायटीच्या निकालात पुन्हा एकदा माजी आमदारप्रणित श्री सिद्धेश्वर सहकारी पॅनेलने 11 जागांवर विजय मिळवत बालेकिल्ला अबाधित राखला असून, राहुल कुल यांच्या जनसेवा पॅनेलला 2 जागावर समाधान मानावे लागले.
पिंपळगाव, लडकतवाडी, नाथाची वाडी या गावांतील पिंपळगाव सोसायटीचे 2300 च्या आसपास असणाऱ्या सभासदांमधून एकूण 1621 सभासदांनी मतदानाचा हक्क बाजावला. सिद्धेश्वर सहकारी पॅनेलला 125 मतांचे लीड लडकतवाडी मधून दिले असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य उद्धव फुले यांनी दिली. पूर्वीपासूनच या सोसायटीवर माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे.
श्री सिद्धेश्वर सहकारी पॅनेलचे दीपक कापरे, रमेश आवाळे, राजेंद्र शितोळे, विशाल चव्हाण, गजानन नातू, अरुण थोरात, सतीश कदम, योगिता फरगडे, रंजना नातू, महेश शिंदे, गोपाळ ठोंबरे असे 11 उमेदवार निवडून आले. जनसेवा पॅनेलचे चंद्रकांत नातू आणि बापू थोरात हे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. निवडीचे पत्र सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी दिले.
सिद्धेश्वर पॅनेलचे नेतृत्व नारायण जगताप, उद्धव फुले, भाऊसाहेब आवाळे, भगवान लडकत, राजकुमार थोरात, शांताराम बधे, गणेश जगताप, संजय होले, उद्धव चोरमले, भाऊ लडकत, गंगासागर इनामके, आप्पा ठोंबरे, दादा ठोंबरे, दिगंबर ठोंबरे, सुरेश लडकत, बाळू लडकत, संपत शितोळे, ईश्वर कापरे यांनी केले.