पुणे -वाढत्या महागाईच्या निषेधार्थ केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असलेल्या हॉटेलात घुसण्याचा प्रयत्न शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.
आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेत असतानाच काही कार्यकर्ते प्रवेशद्वार उघडून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. कार्यकर्त्यांना आत जाता आले नाही. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र शासन तसेच मंत्री इराणी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.