रायपुर – छत्तीसगडच्या दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात जिल्हा राखीव पोलिस दलाचा एक जवान जखमी झाला. हा आयईडी स्वरूपाचा स्फोट होता. बोडली कॅम्प जवळ सुरक्षा जवान रस्त्याची पहाणी करीत असताना आज सकाळी साडे आठच्या सुमाराला हा स्फोट झाला.
जेथे सुरक्षा जवानांची पहाणी सुरू होती, त्या ठिकाणापासून 650 मीटर अंतरावर नक्षलवादी लपले होते व त्यांनी तेथून हा स्फोट घडवला. त्यात जखमी झालेल्या जवानाच्या जखमा किरकोळ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे त्याच्या विषयी िंचंतेचे कारण नाहीं असे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या स्फोटानंतर सुमारे दीड तासाच्या अंतराने म्हणजेच दहा वाजण्याच्या सुमाराला सुरक्षा जवानांना लक्ष करण्यासाठी नक्षलवाद्यांनी आणखी एक स्फोट घडवला. हा स्फोट पाईप आयईडी स्वरूपाच्या स्फोटकांचा होता. पण त्यात मात्र कोणीही जखमी झाले नाही.