Nawab Malik – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ते सध्या दोन महिन्यांच्या जामिनावर असून त्यांना आणखी तीन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. न्या. बेला एम. त्रिवेदी आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात होते. परंतु, तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना मूत्रपिंड विकार आणि इतर आजारांवर उपचार करता यावेत याकरता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. प
रंतु, उच्च न्यायालयाच्या न्या. अनुजा प्रभूदेसाई यांनी नवाब मलिक यांचा वैद्यकीय कारणास्तव तात्पुरता जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
11 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन दिला. आता पुन्हा त्यांच्या जामिनात तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी अंतरीम जामीन वाढण्यास विरोध केला नाही.