Navneet Rana । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी अमरावतीमधून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आता विरोध होताना दिसून येतोय. हा विरोध दुसरीकडून कुठून होत नाही तर महायुतीत समाविष्ट असलेल्या ‘प्रहार जनशक्ती पक्षा’कडून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी भेट घेऊन ही माहिती दिली.
उमेदवार न बदलल्यास युतीतून बाहेर पडणार Navneet Rana ।
बच्चू कडू यांनी या भेटीसंदर्भात बोलताना आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठकीत मी त्यांना वर्धा, अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांची माहिती दिली.असे म्हटले. अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा यांची उमेदवारी कायम राहिल्यास विरोधाशिवाय पर्याय राहणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून उमेदवार न बदलल्यास युतीतून बाहेर पडण्यास संमती द्यावी, असे स्पष्ट सांगितले असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटलंय.
कोण आहेत नवनीत राणा? Navneet Rana ।
नवनीत राणा यांचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. यानंतर त्यांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले. याशिवाय तिने कन्नड, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांनी ‘दर्शन’ या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. नवनीत कौरने 2011 मध्ये रवी राणासोबत सामूहिक विवाह मंडपात विवाह केला. योगगुरू रामदेव बाबांच्या आश्रमात त्यांची भेट झाली.
हेही वाचा
नेमकं कारण काय ? नवनीत राणा आपल्याच पक्षाचा राजीनामा देणार?
नवनीत राणाचा चित्रपट जगतातील प्रवास फार मोठा नव्हता. यानंतर त्या राजकारणात आल्या. सर्वप्रथम त्यांनी NCP पक्षात प्रवेश केला आणि 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद अडसूळ यांचा पराभव करून अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार बनल्या. नवनीत राणा यांना ५१०,९४७ मते मिळाली. तर शिवसेनेचे उमेदवार आनंद अडसूळ यांना ४ लाख ७३ हजार ९९६ मते मिळाली.