कात्रज-मांगडेवाडी परिसरात निसर्ग युवा मंचाकडून गरजूंना मदत

कात्रज (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू च्या लढ्यामध्ये पुणे शहरातील डॉक्टर्स, नर्स व महानगरपालिकेचे कर्मचारी, व पोलिस हे कार्यरत असतानाच, पुणे शहर लॉक डाऊन करण्यात आले. यामुळे शहरातील गरीब बेघर कर्मचारी त्यांचे हातावरचे पोट आहे. त्यांची कामे बंद पडल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न उपस्थित राहिला.

यावेळी अनेक समाजसेवक व दानशूर व्यक्ती यांनी मदतीचा हात त्यांच्यासाठी पुढे केला. यातच कात्रज-मांगडेवाडी परिसरातील नेहमीच मदतशील व दानशूर असणारे निसर्ग युवा मंच व मांगडेवाडी च्या उपसरपंच सौ. निर्मला सुभाष मांगडे यांनी देखील असाच मदतीचा हात मांगडेवाडी परिसरातील गरजू व ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची कामे बंद आहेत, त्यांना महिनाभराचे किराणामाल (गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, व मसाले) घरोघरी जाऊन सोशल दिस्तान्सिंग नुसार योग्य खबरदारी घेत,तब्बल 700 कुटुंबांना वाटप केले.

यावेळी सर्व अन्नधान्याचे किट घरोघरी पोहोचविण्यासाठी सुभाष मांगडे मा. उपसरपंच मांगडेवाडी व सुनील मांगडे उद्योजक, यांच्या मार्गदर्शनाखाली बंटी मांगडे, गौरव मांगडे, लोकेश मांगडे, धनंजय मांगडे, विशाल मांगडे, गणेश काशीद, आकाश सूर्यवंशी, वैभव मांगडे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी मदत कार्य केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.