Senior Women’s National Hockey Championship – जेतेपदासाठी दावेदार असलेल्या हॉकी हरियाणाने गोलांचा पाऊस पाडताना १४ व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत पूल डी सामन्यात ली पुड्डुचेरी हॉकीचा २२-० असा धुव्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशानेही सातत्य राखताना आगेकूच केली.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत रविवारी ड्रॅगफ्लिकर दीपिकाने (चौथ्या, ११व्या, १४व्या, १५व्या, ४२व्या आणि ४९व्या मिनिटाला) हॅट्ट्रिकसह सहा गोल केले, याशिवाय भारताची आंतरराष्ट्रीय नवनीत कौर (२वी, ३३वी, ४५वी), नीलम (१५वी, २५वी, ३०वी), मोनिका (१७वी, १९वी, ५३वी), ज्योती (३२वी, ३३वी), शर्मिला देवी (३५वी, ४१वी, ४५वी), नेहा गोयल (४०वी) आणि उदिता (४२वी) यांनीही गोल करत हॉकी हरयाणाचा विक्रमी विजय नोंदवण्यात मोलाचे योगदान दिले.
हॉकी हरियाणाने दोन सामन्यांतून तितक्याच विजयांसह पूल डीमध्ये अव्वल स्थान पटकावले. ओडिशाच्या हॉकी असोसिएशननेही त्यांच्या दुसर्या आणि अंतिम पूल ई सामन्यात हॉकी चंडिगडवर ६-१ असा सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दीप्ती लाक्राने (१९वे, २३वे) दोन तर अजमिना कुजूर (१५वे), जीवन किशोरी टोप्पो (३०वे), मारियाना कुजूर (५०वे), लिलिमा मिन्झ यांनी (५१वे) ओडिशाच्या हॉकी असोसिएशनसाठी गोल केले. हॉकी चंडिगडचा एकमेव गोल प्रियांका हिने २६व्या मिनिटाला आला.
ओडिशाच्या हॉकी असोसिएशनने पूल ई मध्ये दोन सामन्यांमधून दोन विजयांसह मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. तसेच हॉकी चंडिगड आणि गोवन्स हॉकी यांच्या पुढे बाद फेरीसाठी पात्र ठरले. पूल एफ सामन्यात, हॉकी मिझोरामने हॉकी राजस्थानचा २०-२ असा एकतर्फी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला.भारताची स्ट्रायकर लालरेमसियामी हिने(६वा, २९वा, ३४वा, ३६वा, ५६वा, ६०वा) सहा गोल केले. लालरिनपुई (१३वे, १५वे, २६वे, ५१वे, ५७वे), लालनेइहपुई (१४वे, २२वे, ४९वे, ३९वे, ३०वे), लालरीनपुई एच लालरुआतफेली (११ व्या), लालथंटलुआंगी (१७ व्या), एफ लालबियाक्सियामी (१८ व्या) आणि मरीना लालरामनघाकी (३३ व्या) अप्रतिम खेळ करताना हॉकी मिझोरामच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
WPL 2024 ( #DCvRCB #Final ) : बंगळुरूचा ‘रॉयल’ विजय, दिल्लीवर मात करत जेतेपदावर केला कब्जा…
हॉकी राजस्थानचे दोन गोल उषा कुमारी (३३ वे) आणि मनिषा शर्माने (४६ वे) केले. हॉकी मिझोराम अजूनही अंतिम आठ संघांत स्थान मिळवण्याच्या रेसमध्ये आहे. अशाप्रकारे सातत्य राखताना हॉकी हरियाणा आणि हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा संघांनी, हॉकी मध्य प्रदेश (पूल ए), हॉकी महाराष्ट्र (पूल बी), हॉकी झारखंड (पूल सी) आणि हॉकी बंगालसह (पूल एच) अंतिम आठ संघांतील स्थान निश्चित केले.उपांत्यपूर्व फेरीतील अद्या दोन संघ निश्चित झालेले नाहीत. शनिवारी उशिरा संध्याकाळी तामिळनाडूच्या हॉकी युनिटने पूल एच सामन्यात हॉकी गुजरातला ३-० तसेच हॉकी उत्तराखंडने दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवला ५-० असे पराभूत केले.