uddhav thackeray । Vilas Potnis : मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रात मोबाईलचा वापर केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर आता ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस (Vilas Potnis) यांच्यावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल –
मतदानकेंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या एजन्टने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एवढेच नाहीतर विलास पोतनीस यांच्याबरोबर त्यांचा सशस्त्र पोलीस सुरक्षारक्षक याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ आणि १२८ (२) लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे