अभिनेत्री कंगना राणावतचा ‘धाकड’ हा चित्रपट उद्या म्हणजेच २० मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कंगना उत्तर प्रदेशातील वाराणसीला पोहोचली, जिथे तिने काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेतले. या चित्रपटातील तिची को-स्टार दिव्या दत्तासोबत कंगना राणावतसह पोहोचली. काशी विश्वनाथ मंदिरात गेल्यावर पत्रकरांनी कंगनाला घेरले असता काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या सध्या देशात सुरू असलेल्या वादावर तिचे मत जाणून घेतले.
काशीच्या प्रत्येक कणात भगवान शिव वसले आहेत, असे कंगनाने तिच्या वक्तव्यात म्हटले आहे. एएनआयशी संवाद साधताना कंगना म्हणाली की, मथुरेच्या प्रत्येक कणात भगवान कृष्ण वास करतात, अयोध्येच्या प्रत्येक कणात भगवान राम वास करतात. तसेच काशीच्या प्रत्येक कणात महादेव वसलेला आहे. त्याला कोणत्याही संरचनेची गरज नाही. ‘काशीच्या कणा-कणात महादेव आहेत,’ असे उत्तर कंगणाने दिले. कंगणा आपल्या बेधडक अंदाजासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे.