नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, हिराबेन मोदी यांनी जीवनात संघर्ष केला आहे. पंतप्रधान मोदी आजही आईकडून शिकण्याचा प्रयत्न करत करत आहे.
हिराबेन या अतिशय शिस्तबद्ध होती. हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला शिफ्ट झाल्या.
हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या. घरची आर्थिक व कौटुंबिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही.
पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करण्यासही होकार दिला. फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त मोदींनी आई हिराबेन यांचे पाय धुतले आणि पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला. त्यांचे अनेक फोटो यावेळी व्हायरल झाले होते.