नरेंद्र मोदींनी अब्दुल कलामांना राष्ट्रपती केलं होतं; चंद्रकांत पाटलांचा अजब दावा

मुंबई – राजकीय नेते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी धार्मिक तर राजकीय टीकांमुळे पुढारी चर्चेत येतात. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एका कार्यक्रमातील भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात त्यांनी अजब दावा केला असून त्यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

अतिरेकी कारवायांसाठी स्लीपर सेलमध्ये काम करणाऱ्या मुस्लिमांना विरोध नाही करायचा का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. तसेच सगळ्या मुस्लिमांना विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मोदींना सर्वप्रकारे मुस्लिमांना प्राधान्य दिलं. मोदींनी दिवंगत अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

याआधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांनी अजब दावा केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.