चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला अटक

यामुळे उघड झाला गुन्हा

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी संशयीत म्हणून पकडलेल्या सहा कामगारांच्या चौकशी दरम्यान त्यांच्या मोबाईलची तपासणी केली होती. यापैकी आरोपी कामागाराच्या मोबाईलच्या आयपी ऍड्रेस व युसी ब्राऊझर हिस्ट्रीवरुन त्याने रात्री मोबाईलवर अश्‍लील व्हिडीओ पाहिल्याचे दिसून आले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

पिंपरी – सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्या नराधमास अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल शहरात तीव्र संताप निर्माण झालेला असतानाच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी घटनेचे गांर्भीय ओळखून तात्काळ केलेल्या कारवाईमुळे आरोपीला जेरबंद करण्यात यश आले आहे.

सांगवी परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हा प्रकार घडला होता. या साईटवर काम करणाऱ्या दांम्पत्याच्या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण मंगळवारी (दि. 23) पहाटे करण्यात आले होते. आईच्या कुशीत झोपलेल्या या निरागस चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता. यानंतर तिचा मृतदेह लष्कराच्या मोकळ्या जागेतील नाल्यात टाकण्यात आला. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ माजली होती. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पीडित चिमुकलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांना त्याला आज दि. 25 जुलै रोजी अटक केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)