नायब तहसीलदारांचा लॅपटॉप पळविला

दौंड – दौंड प्रशासकीय कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या चेंबर मधून त्यांचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. डेल कंपनीचा 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, सेवा नोंद पुस्तक व 300 रुपयांचा पेन ड्राईव्ह चोरीला गेला असल्याची फिर्याद त्यांनी दौंड पोलिसात दाखल केली आहे.

दौंड तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सचिन सुरेश आखाडे (वय 29, रा. सध्या डिफेन्स कॉलनी, दौंड) हे बुधवारी (दि.24) नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयात आले, त्यांनी त्यांच्या हातातील लॅपटॉपची बॅग ते बसत असलेल्या खुर्चीच्या बाजूला ठेवली व ते दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय इमारतीतील कार्यालयातील मीटिंगला गेले सव्वा एकच्या सुमारास परत आल्यानंतर खुर्ची शेजारी ठेवलेली लॅपटॉप बॅग त्यांना दिसली नाही, सगळीकडे विचारपूस केल्या विचारपूस केल्यानंतर बॅग सापडली नाही.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी दौंड तहसील कार्यालयातून वाळू चोरी प्रकरणी जप्त असलेले ट्रक चोरीला जात होते ते ट्रक राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्राउंडवर सध्या लावले जात असल्याने चोऱ्या थांबल्या असल्या तरी चोरटे आता थेट शासकीय अधिकाऱ्यांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. शहरातही भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असल्याने पोलिसांनी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

प्रशासकीय इमारतीत सुरक्षा रामभरोसेच!
दौंड नवीन प्रशासकीय इमारतीला ना सुरक्षा रक्षक आहेत, ना सीसीटीव्ही यंत्रणा त्यामुळे त्यांची सुरक्षा ही रामभरोसेच आहे. सध्या, नवीन प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर तीन सीसीटीव्ही आहेत. मात्र, त्यातील दोन चालू असून एक बंद आहे तसेच पहिल्या व तिसऱ्या मजल्यावर सीसीटीव्हीच नाहीत, त्यामुळे तालुक्‍याचे कामकाज ज्या विभागातून चालते अशा सर्व विभाग एकत्रित असणाऱ्या प्रशासकीय इमारतीची सुरक्षा रामभरोसे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.