संगमनेर तालुका ठेकेदारांच्या ताब्यातः विखे

संगमनेर – संगमनेर तालुका ठेकेदार चालवित असून हा तालुका त्याच्याच ताब्यात आहे. ही ठेकेदार संस्कृती नष्ट करायची असेल तर त्याची मुहूर्तमेढ नगरपालिका निवडणुकीपासून सुरू करायला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी घेण्यात आलेल्या वज्रनिर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी करीत मला फक्त आगे बढो च्या घोषणा नकोत, तळागाळात जाऊन काम करणारे सोबत पाहिजे. तसेच केंद्र सरकारने आजपर्यंत किती मदत केली.

तालुक्‍यासाठी याची माहिती आपल्याला पाहिजे. नुसते नारे देऊन उपयोग नाही. आतापर्यत मोफत धान्य किती मिळाले, याचा हिशोब जनतेला सांगा. असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. तसेच ठेकेदार संस्कृती नगरपालिकेने जोपासली आहे. तालुका ठेकेदारांचा असून वाळू ठेकेदार, जमिनीचे ठेकेदार, सगळी ठेकेदार संस्कृती पोसली आहे. असा टोला ही त्यांनी लगावला.

ऍड. श्रीराम गणपुणे म्हणाले,आगामी संगमनेर नगरपालिका निवडणूक आपण सर्व जागा लढवणार असून सगळ्या जागा निवडून आणणार आहे. गेली चाळीस वर्षे एक हाती सत्ता असूनही संगमनेर शहर विकासापासून कोसो दूर आहे.

यावेळी भाजप रणनीती आखून प्रत्येक वार्डात घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. यावेळी गट नेते जालिंदर वाकचौरे, राजेंद्र गोंदकर, जावेद जहागीरदार यांची भाषणे झाली.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,सतीश कानवडे, मेघा भगत, विक्रम खताळ, वसंत गुंजाळ, वसंत देशमुख, सुधाकर गुंजाळ, वैभव लांडगे, शिरीष मुळे, शशिकांत मतकर उपस्थिती होते.

हृदय हेलावणारा अपघात
संगमनेर तालुका ठेकेदारांच्या ताब्यातः विखेअपघात झाल्यानंतर मालट्रकखाली रक्ताच्या थारोळयात पडलेल्या मृतदेहांची अवस्था अंगावर शहारे आणणारी होती. सुपा पोलीस घटनेची माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या सहाय्याने अपघाती वाहने वेगळी केली व मृतदेह बाहेर काढून पारनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविली. त्यानंतर रस्ता वाहतूकीसाठी सुरळीत झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.